आशियातील सर्वात मोठा झोजिला बोगद्याचे 70 टक्के काम पूर्ण; Minister Nitin Gadkari यांची माहिती

118

Nitin Gadkari : जम्मू-काश्मीरला लद्दाखशी जोडणाऱ्या आशियातील सर्वात लांब बोगद्याची 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 13 किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. दरम्यान, हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे (snowfall) लडाखचा उर्वरीत भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करणार मंत्री ॲड. Ashish Shelar यांची घोषणा)

यासंदर्भात नितीन गडकरी म्हणाले की, लद्दाख (Ladakh), जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) येथे हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते. बर्फ वृष्टीमुळे अनेकदा या भागाचा उर्वरीत देशाशी संपर्क तुटतो. त्यामुळेच लद्दाखला देशाच्या इतर भागांशी सर्व ऋतूंमध्ये जोडण्यासाठई झोजिला (Zojila Tunnel) हा महत्वाचा प्रकल्प आहे. सुरुवातीला या बोगद्याचा खर्च 12 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज होता, मात्र तो आता केवळ 5500 कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. झोजिला बोगद्यामुळे श्रीनगर-लेह महामार्ग (Srinagar-Leh Highway) वर्षभर सुरू राहणार आहे. हिवाळ्यात हा महामार्ग बंद झाल्यामुळे सामान्य नागरिक आणि लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र बोगदा (tunnel) पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न सुटणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.