मराठा (Maratha) समाजातील ८० टक्के जनता हिंदुत्ववादी असून २० टक्के पुरोगामी असावेत. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरविण्याचा प्रयत्न झाला; पण मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूतीच आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात व्यक्त केला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या व्यासपिठांवरून राजकीय गौप्यस्फोट करत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले हे स्पष्ट विधान केले.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: राज्यात निवडणुकांमुळे ३ दिवस शाळा बंद राहणार? वाचा सविस्तर)
या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जातीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात दरी निर्माण होणे, हे चिंताजनक आहे. मराठा आणि ओबीसी समाजांत दरी निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या दोन समाजांमध्ये दुरावा निर्माण होणे, हे राज्याला परवडणारे नाही. घाव घालायला वेळ लागत नाही; पण जखम भरून येण्यास वेळ लागतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा समाजात चुकीचे कथानक पसरवण्यात आले. मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्यात आले. यामागे मराठा समाजाची नाराजी नव्हती, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या घटक पक्षांचा हात होता. ८० टक्के मराठा समाज हा पारंपरिकदृष्ट्या हिंदुत्ववादी विचारांचा आहे. या समाजाने कायम हिंदुत्वाचा पुरस्कार करत महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीतही मराठा समाज पारंपरिकदृष्ट्या महायुतीच्या मागे खंबीरपणे उभा राहील.
निकालात जमीन-अस्मानाचा फरक दिसणार
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ग्रामीण भागातील मतदार काही प्रमाणात आमच्या विरोधात गेला होता. पण हा मतदार पुन्हा आमच्याबरोबर आला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आरक्षण रद्द करणार आणि घटना बदलणार हे खोटे कथानक पसरविले होते. विदर्भात दलित आणि आदिवासी मतदारांचे प्रमाण सरासरी ३२ टक्के आहे. खोट्या कथानकामुळे हे दोन्ही समाज लोकसभा निवडणुकीत आमच्या विरोधात गेले होते. आता हे दोन्ही समाज विदर्भात महायुतीला पाठिंबा देतील. यामुळेच विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या नेमके विरोधी चित्र बघायला मिळेल. मराठवाड्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला बघायला मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community