India : 12 वर्षांत 17.5 लाख  भारतीयांनी सोडले नागरिकत्व; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री? 

209
Kanishka Plane Blast: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला वाहिली श्रद्धांजली, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सज्जड दम; म्हणाले...
Kanishka Plane Blast: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला वाहिली श्रद्धांजली, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सज्जड दम; म्हणाले...

यावर्षी जूनपर्यंत भारतातील 87 हजार लोकांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात जयशंकर म्हणाले- 2011 पासून आतापर्यंत 17.5 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. यातील बहुतांश लोक अमेरिकेत जातात.

भारतीय ग्लोबल वर्कप्लेसच्या शोधात

जयशंकर म्हणाले की, गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय जागतिक कार्यस्थळांच्या शोधात आहेत. यातील अनेकांनी आपल्या सोयीसाठी इतर देशांचे नागरिकत्व घेतले. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, 2020 मध्ये 85 हजार, 2021 मध्ये 1.63 लाख आणि 2022 मध्ये 2.25 लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले होते. ते म्हणाले की, सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून मेक इन इंडिया अंतर्गत असे अनेक प्रयत्न केले आहेत, जेणेकरून देशात राहून नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळू शकेल. सरकारने कौशल्य आणि स्टार्टअपलाही प्रोत्साहन दिले आहे.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींचे गुजरातवर प्रेम, तुमचेही महाराष्ट्रावर असले पाहिजे; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र )

परदेशात असलेला भारतीय समुदाय ही आपली संपत्ती आहे. त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने पावले उचलत आहोत. सरकारने भारतीय समुदायाला जोडण्यासाठी अनेक बदल लागू केले आहेत. प्रभावशाली भारतीय डायस्पोरा ही आमच्यासाठी एक संपत्ती आहे आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी पावले उचलत राहू, असेही जयशंकर म्हणाले.

बहुतेक भारतीय अमेरिकेत आणि नंतर ऑस्ट्रेलियाला जातात

2021 मध्ये अमेरिकेत गेलेल्या 7.88 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर राहिला, जिथे 23,533 भारतीयांनी नागरिकत्व सोडले. यानंतर कॅनडा तिसऱ्या, तर ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. परदेशातील भारतीयांच्या सोयीसाठी भारत सरकारनेही अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यांच्या यूएस दौऱ्यादरम्यान, पीएम मोदींनी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.