अलिगढमध्ये 94 बेकायदेशीर Madrasa होणार बंद; 2000 मुले आता सरकारी शाळांमध्ये शिकणार

125

उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या मदरशांवर (Madrasa) कडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 94 अनोळखी मदरसे ओळखून ते बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहेत. हे सर्व मदरसे (Madrasa) बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मदरशांमध्ये शिकणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे. प्रशासनाने बुधवारी, ३१ जुलै २०२४ रोजी या कारवाईची माहिती दिली.

उत्तर प्रदेश सरकारकडून यावर्षी २६ जून रोजी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र आले होते. मुख्य सचिवांनी डीएम अलिगढ यांना पाठवलेल्या या पत्रात जिल्ह्यातील बेकायदा मदरशांची (Madrasa) ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पत्र मिळाल्यानंतर अलिगढचे जिल्हा दंडाधिकारी विशाख जी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली होती. या टीममध्ये SDM, BSA, DSP, DIOS आणि जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांचा समावेश होता.

(हेही वाचा Rahul Gandhi दारू किंवा ड्रग्जचे सेवन करून संसदेत येतात; कंगना रणौत यांचा आरोप)

तपासाची व्याप्ती वाढवणार 

या पथकाने संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व मदरशांची (Madrasa) सातत्याने पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, 94 मदरसे बेकायदेशीर सुरु असल्याचे समोर आले. जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी निधी गोस्वामी यांनी बुधवारी, ३१ जुलै २०२४ रोजी हे मदरसे बंद केले जातील, असे म्हटले. यामध्ये शिकणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे. तपासाची व्याप्ती वाढवण्यासाठी मान्यताप्राप्त मदरशांतील शिक्षकांनाही संघात समाविष्ट करण्यात आले आहे. हे मदरसा  (Madrasa) शिक्षक बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मदरशांची यादी तयार करण्यासाठी प्रशासनाला मदत करणार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.