पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूर्ती बसवून त्यांची मंदिर बांधण्यात आल्यावर मोठा हलकल्लोळ माजला होता. अखेर दिल्लीवरून त्याची दखल घेण्यात आली, तेथून आदेश येताच रातोरात मोदींची मूर्ती हटवण्यात आली. त्याच पुण्यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ९ फुटांचा धातूचा फोटो निर्माण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे व्यक्ती पूजेसाठी चर्चेत येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारण्यात आला आहे. महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी हा पुतळा तयार केला आहे. शरद पवार यांचा हा पुतळा धातूचा असून त्याची उंची ९ फुटांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. हा पुतळा हुबेहुब साकारण्यात आला असून पवार यांचे शिल्प चित्तवेधक असल्याचे त्या म्हणाल्या.
(हेही वाचा : अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित)
८ महिन्यांत बनवला पुतळा!
शरद पवार यांच्या पुतळ्यासाठी दीड टन धातूचा वापर करण्यात आला आहे. शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना हा पुतळा साकार करण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. हा पुतळा साकारण्यासाठी शिंदे या दररोज १० तास काम करत होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी २७ सप्टेंबर या दिवशी शिंदे यांच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमधील विविध शिल्प पाहून सुप्रिया सुळे अचंबित झाल्या. त्यांनी येथील शिल्पांचे फोटो ट्विट करत माहिती दिली.
Join Our WhatsApp Community