Lok Sabha Election 2024: शिवसेनेच्या शिलेदारांवर देण्यात आली मोठी जबाबदारी; श्रीकांत शिंदे शिवसेनेचे गटनेते तर श्रीरंग बारणे प्रतोदपदी

एनडीएच्या सरकारमध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.

202
Lok Sabha Election 2024: शिवसेनेच्या शिलेदारांवर देण्यात आली मोठी जबाबदारी; श्रीकांत शिंदे शिवसेनेचे गटनेते तर श्रीरंग बारणे प्रतोदपदी

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीए (NDA) आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली, आणि त्यात सर्वांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची ९ जून रोजी शपथ घेणार आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिवसेनेला (Sheikant Shinde) मोठा वाटा मिळणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित दोन खासदारांना पद देण्यात आली आहेत. (Lok Sabha Election 2024)      

(हेही वाचा – State Excise Department ची कारवाई; २१.८८ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त)

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ७ जागांवर शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीकांत शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) हे पक्षाचे संसदेतील प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.  (Lok Sabha Election 2024)

एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार सर्वात महत्त्वाची खाती भाजपा (BJP) स्वतःकडे ठेवणार आहे. प्रत्येकी ४ खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीचे १६ खासदार आहेत, त्यामुळे त्यांना चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर १२ खासदार असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला तीन मंत्रिपदं दिली जाण्याची चिन्हं आहेत. मात्र नेमकी कुठली खाती घटकपक्षांना देणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.