ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पुन्हा अडचणी वाढल्या आहेत. कारण संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरुन नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा: दरवर्षी लाल किल्ल्यावर साजरी केली जाणार शिवजयंती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट
शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा आहे.
Join Our WhatsApp Community