पुण्यातील माजी अध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 17 मार्चला पाण्यावरुन पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आले होते. त्यावरुन त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे आहे प्रकरण
पुणे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांनी 100 ते 125 कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांनी प्रवेशद्वारावर आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षारक्षकाचे न ऐकता थेट महापालिकेत प्रवेश केला आणि पालिकेच्या तिस-या मजल्यावर कार्यकर्त्यांना गोळा करुन घोषणाबाजी करत आंदोलन केले. असे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी: नवज्योत सिंग सिद्धू यांना कारावासाची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश)
मोरेंची पोस्ट चर्चेत
वसंत मोरेंना अध्यक्ष पदावरुन हटवल्यावर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचे दिसून आले होते. पण, दोघांना एकत्र पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश आल्याने, त्यावरच मोरे यांनी तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच अशी पोस्ट फेसबुकच्या माध्यमांतून केली आहे.
Join Our WhatsApp Community