उद्धव ठाकरेंविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – किरीट सोमय्या

150

कोरोना कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफलाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांंनी दिले. त्याच दरम्यान कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा बळीदेखील गेल्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.

यावेळी सोमय्या म्हणाले की, ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन कंपनीला कोरोना कालावधीत शिवाजीनगर येथे कोविड सेंटर उभारण्याचे काम देण्यात आले होते. त्यावेळी ती कंपनी अस्तित्वातही नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना हे काम दिले होते. त्यावेळी कशा पद्धतीने बिल देण्यात आले होते. या सर्व गोष्टी वेळोवेळी सर्वांनी पाहिल्या आहेत. त्याच दरम्यान शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधील तब्बल शंभर रुग्णांचे शारीरिक नुकसान झाले आहे.

(हेही वाचा – शिवसेना भवनसह शाखा ताब्यात द्या; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.