औषध तुटवड्याच्या तपासणीसाठी समिती स्थापन करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांची माहिती

36
औषध तुटवड्याच्या तपासणीसाठी समिती स्थापन करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांची माहिती
औषध तुटवड्याच्या तपासणीसाठी समिती स्थापन करणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांची माहिती

राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा किती आहे याचा तपशीलवार अहवाल तयार करण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात येईल. ही समिती १५ दिवसांत अहवाल सादर करेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सरकारी रुग्णालयातील औषध तुटवड्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अजय चौधरी, योगेश सागर, अमित देशमुख, नाना पटोले, देवयानी फरांदे, रोहित पवार यांनीही उपप्रश्न विचारले.

(हेही वाचा – Nagpur Violence : हिंसाचार भडकवण्यासाठी बांगलादेशमधून चिथावणी; पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क)

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील रुग्णालयांना लागणारी औषधे तसेच यंत्रसामग्री खरेदी २०१७-१८ या वर्षापासून हाफकीन संस्थेमार्फत करण्यात येत होती. हाफकीनच्या माध्यमातून होणाऱ्या औषध खरेदीबाबत अनेक तक्रारी आल्यामुळे सन २०२३ पासून वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. आता या प्राधिकरणाकडून औषधे आणि यंत्रसामग्री खरेदी केली जात आहे, अशी माहिती मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत हाफकिन महामंडळाला २ हजार ६५३ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी १ हजार ३१८ कोटी २४ लाख रुपये खर्च झाले तर ९५७ कोटी १२ लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित ३७८ कोटी ४० लाख रुपयांपैकी २९६ कोटीची प्रलंबित देयके तसेच सुरू असलेल्या खरेदीसाठी वापरण्यात येणार आहेत, असेही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.