परमबीर सिंह, ३० दिवसांत हजर व्हा! न्यायालयाचा आदेश

133

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केलेले आणि सध्या फरार म्हणून घोषित असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतात आहे, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत गोरेगाव पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने सिंह यांना फरार घोषित केले होते. न्यायालयाची हीच नोटीस आता परमबीर सिंह यांच्या जुहूच्या घराबाहेर लावण्यात आली आहे. संबंधित कारवाई ही न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

परमबीर न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर…

मुंबईच्या स्थानिक न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी देखील दिली आहे. यावरून परमबीर सिंह, रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंह न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांच्या घराबाहेर ‘या’ संघटनेचा राडा)

३० दिवसांत हजर व्हा, न्यायालयाचा आदेश

समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाचा आदेश परमबीर सिंह यांच्या जुहूतील घराबाहेर चिकटवण्यात आला आहे. या आदेशानुसार, परमबीर सिंह यांना ३० दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले आहे. दरम्यान, गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावेळी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात अर्ज दाखल करून परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाज भाटी, विनय सिंग या दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.