Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका

144
Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका
Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सत्तेवर येताच त्यांनी अशा अनेक घोषणा केल्या, ज्यामुळे जगातील देशांची झोप उडाली आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan), बांगलादेश (Bangladesh) आणि नेपाळसारखे भारताचे शेजारी देश अडचणीत आले आहेत. ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकारी आदेशानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरती बंदी घातली आहे. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीचे पुनर्मूल्यांकन करण्याचेही आदेश आहेत.

पाकिस्तानमध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 5 योजना ठप्प
जिओ न्यूजनुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमधील यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी (USAID) च्या अनेक महत्त्वाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. अहवालानुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 5 योजना ठप्प झाल्या आहेत. याशिवाय आरोग्य, कृषी, अन्न सुरक्षा, पूर, हवामान आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांनाही याचा फटका बसला आहे. यातील काही कार्यक्रम कायमचे बंद होतील किंवा ते लक्षणीयरीत्या कमी होतील अशी भीती आहे. (Donald Trump)

पाकिस्तानचा विकास दर अंदाज 3 टक्क्यांपर्यंत कमी
न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाच्या या आदेशात गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान सरकार दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. देशाकडे फक्त 16 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक आहे. सप्टेंबरमध्येच पाकिस्तान सरकारला IMF कडून 7 अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज मिळाले. त्याच वेळी, IMF ने 2025 साठी पाकिस्तानचा विकास दर अंदाज 3 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. (Donald Trump)

USAID कसे काम करते?
अमेरिकेची यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट जगभरातील विकास कामांसाठी मदत करते. लोकशाहीला चालना देणे आणि गरिबी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.