- खास प्रतिनिधी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार, मग खातेवाटप याबाबत निर्णय घेण्यासाठी जसा कालावधी लागला तीच परिस्थिती पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्याबाबत निर्माण झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत २६ जानेवारी २०२५ पूर्वी पालकमंत्री पदाचा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. (Guardian Minister)
एकाच जिल्ह्यात तीन पक्षाचे मंत्री
सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पदासह एकूण ४२ मंत्री असून त्यातील ३५ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्री आहेत तर एकूण जिल्हे ३६ आहेत. महायुती सरकारमध्ये भाजपा-शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात मुंबई (शहर), पुणे, रायगड, सातारा, बीड अशा अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे दोन ते तीन पक्षाचे मंत्री एकाच जिल्ह्यातील आहेत. (Guardian Minister)
(हेही वाचा – Sri Ganesh Gaurav Competition-2024 पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटात आणि उत्साहात पार पडला)
३६ मंत्री आणि ३६ जिल्हे
एकाच जिल्ह्यात दोन-तीन राजकीय पक्षांचे मंत्री असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण होण्याची शक्यता अधिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्याची इच्छा याआधीच बोलून दाखवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह ३६ मंत्री आणि ३६ जिल्हे झाल्याने राज्यमंत्र्यांना या टर्ममध्ये पालकमंत्री पदाची संधी मिळणार नाही, असे चित्र आहे. (Guardian Minister)
बीडच्या पालकमंत्री पदाचा पेच
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्येवरून जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. बीडचे पालकमंत्री पद गेल्या टर्ममध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे होते. धनंजय मुंडे त्यावेळी बीडचे पालकमंत्री होते तर आता राष्ट्रवादीकडून धनंजय आणि भाजपाकडून पंकजा मंत्रीपदी असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
अनेक जिल्ह्यात अंतर्गत वाद असल्याने जिल्ह्याबाहेरचा पालक मंत्री निवडण्याचा पर्याय मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. (Guardian Minister)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community