महाराष्ट्रात 12 हजार रोजगाराची निर्मिती होणार; उपमुख्यमंत्र्यांनी केले ट्वीट

105

राज्यात मोठे प्रकल्प आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार काम करत आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवदा ग्रुपच्या शिष्टमंडळाबरोबर राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरद्वारे माहिती दिली आहे.

अवदा ग्रुपचे विनित मित्तल यांच्या नेतृत्वाखाली चर्चा पार पाडली. राज्यात 45 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

12 हजार रोजगार निर्माण होतील

अवदा ग्रुपचे विनीत मित्तल यांच्या नेतृत्वाखाली चर्चा पार पडली. राज्यात 45 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. तसेच, हा जागतिक स्तरावरील पहिला अनोखा प्रकल्प आहे. ज्यामुळे राज्यात किमान 12 हजार रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: राष्ट्रवादीत लवकरच मोठी फूट; बावनकुळे यांचा दावा )

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचा एक भाग म्हणून भविष्यातील स्वच्छ ऊर्जा म्हणून ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाकडे बघितले जाते. या प्रकल्पातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल आणि सुमारे 12 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. आम्ही अवदा ग्रुपला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.