Assembly Session : जयकुमार गोरेंच्या बदनामीसाठी रचण्यात आले जाणीवपूर्वक षडयंत्र; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

41
Illegal Hukka Parlour आढळल्यास हॉटेल मालकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा!
  • प्रतिनिधी

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीसाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. “या कटात संबंधित महिला, कथित युट्यूबर तुषार खरात यांचा सहभाग होता. गोरे यांच्या बदनामीसाठी तयार केलेले व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकरराव देशमुख यांच्याकडे पाठविले जात होते,” असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केला. (Assembly Session)

राजकारणात वैर असू शकते, पण जीवनातून उठवण्याचे राजकारण नको – मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपण राजकारण करत असतो, वैचारिक मतभेद असतात, पण कोणाला जीवनातून उठवण्याचे राजकारण करणे योग्य नाही. जयकुमार गोरेंच्या धैर्याला मी सलाम करतो. ही चौकशी होणारच आहे, पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.” (Assembly Session)

(हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आदेश)

प्रकरण संपले तरी उकरून काढले, महिलेने मागितली लाच – ट्रॅप लावला गेला

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की, “गोरे यांच्यावरील केस २०१९ मध्येच संपली होती, पण ती पुन्हा उकरून काढण्यात आली. संबंधित महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागितली, पोलिसांना खात्री पटल्यावर ट्रॅप लावून तिचे संभाषण रेकॉर्ड केले. तिच्यासह तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांना अटक करण्यात आली आहे.” (Assembly Session)

ते पुढे म्हणाले, “या कटात शरद पवार गटाचे लोक सहभागी होते, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. प्रभाकरराव देशमुख हे तिन्ही आरोपींशी शंभर वेळा बोलले आहेत. हे व्हिडिओ प्रसिद्ध होण्याआधी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि देशमुख यांच्याकडे पाठवले जात होते. आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही. त्यामुळे यामधील सर्वांनी आत्मचिंतन करावे.” (Assembly Session)

(हेही वाचा – बीड जिल्हा रुग्णालयातील Covid काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांचे निलंबन)

हक्कभंग समिती बिनधास्त, सभागृहाचा अवमान रोखला पाहिजे – मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका

मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले, “हक्कभंग समितीला आता नखेच राहिली नाहीत. रोज तीच माणसं मंत्र्यांविरोधात बोलतात, दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अवमानासंबंधीच्या कविताही सभागृहात वाचल्या. इथे संविधानाची भाषा करायची आणि सभागृहाचा अवमान करायचा, हे योग्य नाही.” (Assembly Session)

त्यांनी इशारा दिला, “हक्कभंगाचा वापर वैयक्तिक अपमानासाठी नको, पण जेव्हा सभागृहाचा अवमान होतो, तेव्हा मात्र कडक कारवाई झाली पाहिजे.” (Assembly Session)

‘माझा कोणताही जवळचा अपराधी असेल तरी सोडणार नाही’ – मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गृहमंत्री म्हणून प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली जाते. पण मी स्पष्ट सांगतो, माझे सगे संविधान आणि १३ कोटी जनता आहेत. माझा कोणताही जवळचा अपराधी असेल, तरी मी त्याला सोडणार नाही. समाजाचा शत्रू असलेल्यांना मी माफ करणार नाही.” (Assembly Session)

शेवटी त्यांनी विरोधकांना सुनावत म्हटले, “तुमचा आम्हाला फोडण्याचा प्रयत्न असतो, पण आम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी, एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, तर हातात हात घालून राज्य चालवणार आहोत.” (Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.