शिवरायांनी वापरलेल्या वाघनखांविषयी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचे कारस्थान; इंद्रजीत सावंत यांच्यावर Sunil Pawar यांचा घणाघात

द्रजीत सावंत हे कायम विद्रोही विचार मांडत आले आहेत. त्यांच्या बोलण्यातून कायम हिंदुविरोधी, ब्राह्मणविरोधी विचार ऐकिवात येत असतात, असे सुनील पवार म्हणाले.

379
लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेलीच आहेत, त्यामुळेच महाराष्ट्र सरकार ही वाघनखे महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी राज्य सरकार आणणार असणारी वाघनखे ही शिवरायांनी वापरलेलीच नव्हती, असे म्हणत इतिहासकार इंद्रजीत सावंत हे महाराजांच्या इतिहासाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे कटकारस्थान रचत आहेत. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे खाते हे महान कार्य करत असताना त्यात मिठाचा खडा टाकण्यासाठी सावंत प्रयत्नरत आहेत, असे श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले सुनील पवार? 

इंद्रजीत सावंत हे कायम विद्रोही विचार मांडत आले आहेत. त्यांच्या बोलण्यातून कायम हिंदुविरोधी, ब्राह्मणविरोधी विचार ऐकिवात येत असतात. आम्ही रायगडावर महाराजांचा शिवराज्याभिषेक तारखेनुसार साजरा न करता तिथीनुसार करण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्य सरकारनेही पाठिंबा दिला आहे. मात्र इंद्रजीत सावंत यांच्या डोळ्यांत हे खुपत आहे. त्यांना तिथीनुसार हा दिवस साजरा करण्याला विरोध आहे, त्यामुळे ते तारखेनुसार साजरा कारण्याचा आग्रह धरत आले आहेत. वास्तविक महाराजांनी त्यावेळी तिथी पाहूनच हा दिवस साजरा केला होता, त्यामुळे तारखेनुसार हा दिवस साजरा करण्यात काहीच अर्थ नाही, असे आपण स्पष्ट सांगितले आहे. त्यावेळी सावंत यांच्याशी आमचे मतभेद झाले होते, आता पुन्हा सावंत यांनी महाराजांच्या वाघनखांवर संशय घेऊन त्यांच्या विघ्नसंतोषी स्वभावाचे प्रदर्शन केले आहे, असे सुनील पवार (Sunil Pawar) म्हणाले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराजांच्या इतिहासातील जिवंत साक्ष असलेल्या वस्तू ज्या लंडनमध्ये आहेत, मग ती भवानी मातेची तलवार असो की महाराजांनी वापरलेली वाघनखे असो, या वस्तू राज्यात आणण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न इंद्रजीत सावंत करत आहेत, यावरून ते किती कोत्या मनाचे आहेत, हेच दिसते, असेही सुनील पवार (Sunil Pawar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.