भौगोलिक आकार, लोकसंख्या, आर्थिक सुबत्ता आणि लष्करी सामर्थ्य असलेल्या बलाढ्य देशाच्या म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे (US president elections) वारे जोरदार वाहू लागले आहेत. अशातच गेल्या आठवड्यात ‘डीप स्टेट’ (Deep State) संदर्भात प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. असे काय आहे या पुस्तकात?
गौप्यस्फोट
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एच.आर. मॅकमास्टर यांनी लिहिलेल्या ‘ॲट वॉर विथ अवरसेल्व्हः माय टूर ऑफ ड्यूटी इन द ट्रम्प व्हाईट हाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मॅकमास्टर यांनी पुस्तकात एक गौप्यस्फोट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मागील अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मॅकमास्टर हे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
(हेही वाचा – Piyush Goyal : खासदार पियूष गोयल यांच्यासाठी महापालिका मुख्यालयच हलवले बोरीवलीत)
पाकिस्तानला मदत नाकारली
अमेरिकेतही (US) राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाचे पालन केले जात नाही, असे खळबळजनक वक्तव्य मॅकमास्टर यांनी केले आहे. तसेच त्याचे कारणही त्यांनी आपल्या पुस्तकात दिले आहे. ते सांगतात, काही कृत्य थांबवण्याचे ट्रम्प यांचे आदेश असतानाही त्याची पूर्तता राज्य आणि सुरक्षा यंत्रणांकडून करून घेणे त्यावेळी अवघड होते. पाकिस्तान जोपर्यंत अतिरेकी संघटनांना मदत करणे बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानला, काही अपवाद वगळता कोणतीही मदत दिली जाऊ नये, या दक्षिण आशिया धोरणाच्या विरुद्ध कार्यवाही होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी आठवड्याभरात इस्लामाबादला भेट दिली आणि १५० दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीचे पेंटागॉन लष्करी मदत पॅकेज देण्याची तयारी केली जात होती, ज्यात लष्करी वाहनांचाही समावेश होता.
मदत थांबवली
याची माहिती मिळताच ती मदत मॅकमास्टर यांनी तात्काळ थांबवली आणि जिम मॅटिससह अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मॅकमास्टर यांनी पुस्तकात पुढे म्हटले आहे की, ‘राष्ट्राध्यक्ष (तत्कालीन) ट्रम्प यांनी पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत देऊ नये अशा स्पष्ट आणि वारंवार सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत अफगाणी, अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानमधील युतीचे सदस्य यांना ठार मारणाऱ्या अतिरेकी संघटनांना मदत करणे थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला मदत करू नये’, अशी त्या बैठकीत चर्चा झाली.
(हेही वाचा – Chartered Accountant Salary: तुम्हाला माहित आहे का, CA चा मासिक पगार किती असतो?)
‘डीप स्टेट’ची प्राथमिक उद्दिष्टे
पेंटागॉन आणि स्टेट डिपार्टमेंटमधील अमेरिकन सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण ‘डीप स्टेट’ (Deep State) चालवते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धातील तज्ञांनी डीप स्टेटची तीन प्राथमिक उद्दिष्टे ठरवून दिली आहेत. रशियाला कमकुवत करणे, चीनला आव्हान देणे आणि इस्रायलला पाठिंबा देणे, अशी ही उद्दिष्टे असून देशात कोणत्याही पक्षाचा आणि कोणीही उमेदवार राष्ट्रपती झाला तरी या धोरणात बदल होणार नाही.
‘डीप स्टेट’चा शब्द अंतिम
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून कमला हॅरिस (Kamalaa Harris) यांचे पारडे सध्या जड असल्याचे चित्र आहे. कमला किंवा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यापैकी कोणीही अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तरीही जागतिक धोरणांबाबत ‘डीप स्टेट’चा (Deep State) शब्द हाच अंतिम असेल यात शंका नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community