आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना आतापासूनच कामाला लागली असून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान तब्बल चार तास बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)
विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून शिवसेनेचीही बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत १०० च्या आसपास जागांवर तयारी करण्याचा प्लॅन आखला आहे. त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून विधानसभा क्षेत्रात निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रभारीसुद्धा नेमले आहेत. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार; पर्यटनमंत्री Girish Mahajan यांचा दावा)
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत आगामी निवडणूक आणि पक्ष बांधणीवर जवळपार चार तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा. पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या. सदस्य नोंदणीवर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या आहेत. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community