सुरक्षेची हमी देणारे महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार; Dr. Satyapal Singh यांचा विश्वास

47
सुरक्षेची हमी देणारे महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार; Dr. Satyapal Singh यांचा विश्वास

सर्वांना साथ, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा विकास या ब्रीद वाक्याचे पालन करणाऱ्या केंद्र आणि राज्यांमधील भाजपाप्रणित सरकारांनी समाज आणि राष्ट्राला सुरक्षा दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुती सरकारलाच मतदार निवडून देणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह (Dr. Satyapal Singh) यांनी मंगळवारी (५ नोव्हेंवर) पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. या वेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

डॉ. सत्यपाल सिंह (Dr. Satyapal Singh) यांनी सांगितले की, भाजपाप्रणित सरकारच्या गेल्या साडेदहा वर्षांच्या कार्यकाळात जम्मू काश्मीर मधील घटना वगळता देशात कोठेही बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या नाहीत. नक्षलवाद 80 टक्के आटोक्यात आला. कठोर कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी आटोक्यात आली. हेच महाराष्ट्रात झाले. पोलिस दल सक्षम करण्यासाठी 20 हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. आठ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले. न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली. जलदगती न्यायालयांची संख्याही वाढली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी 850 कोटींचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन वर्षांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 58 टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आहे. त्यामुळे येथील जनता सुरक्षा, समृध्दी देणारे भाजपा महायुतीचे सरकार निवडून आणेल.

(हेही वाचा – Patan मध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?)

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुठेही भूकबळी गेले नाहीत. 80 कोटी जनतेला त्यांनी मोफत अन्न पुरवले. गरिबांना मोफत घरे दिली. लाडकी बहिण योजना सुरू केली. मागास समाजाला प्रगतीची दारे उघड करण्यासाठी आर्थिक महामंडळांची स्थापना, गॅस जोडणी, कागदपत्रांवर महिलांच्या नावांची नोंद करण्याला प्राधान्य दिले. देशातील कोणताही समुदाय असा नाही की त्याला भाजपाने राजकारणात पुढे आणले नाही, असेही त्यांनी नमूद केले. युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारताने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. एकूणच भारताने घेतलेल्या परराष्ट्रविषयक धोरणामुळे जगभरात भारतीय पासपोर्ट आणि तिरंग्याचा सन्मान वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशवासीयांच्या आस्था आणि संस्कृतीची थट्टा केली. श्रीराम अस्तित्वातच नव्हते असे प्रतिज्ञापत्र काँग्रेस सरकारनेच न्यायालयात दाखल केले. पूर्वीही सोमनाथ मंदिराला भेट देऊ नका, असे पत्र तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पाठवले होते, अशी आठवण करून देत डॉ. सत्यपाल सिंह (Dr. Satyapal Singh) यांनी आता भाजपाने तीर्थक्षेत्रांचा विकास घडवत देशाचा विकास घडवून आणल्याचे सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.