रत्नागिरीत मँगो पार्कसाठी निवेंडी तर रिळउंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासाठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर रत्नागिरीमध्ये मँगोपार्क तर दापोलीतील हर्णे येथे फिशपार्क उभारण्याची घोषणा उदय सामंत (Uday Samant) यांनी केली होती. त्या द़ृष्टीने रत्नागिरी मतदारसंघात निवेंडी येथे मँगो पार्क उभारण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. (Uday Samant)
या मँगो पार्कमध्ये आंब्यावर आधारित पूरक प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. आंबा कॅनिंग, ग्रीडिंग असे प्रकल्प यात होणार आहेत. कोकणातील आंब्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती देणार आहेत. आंबा प्रक्रियावर आधारित उद्योगांना एकत्रित आणण्यात येणार आहे. (Uday Samant)
यासाठी 104 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची मोजणीही पूर्ण झाली आहे. यासाठी 144.99 कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे. या जागेचे अंतिम नोटीफिकेशनही निघाले आहे. याचप्रमाणे रिळउंडी येथेही प्रकल्प उभारला जाणार असून, याठिकाणी 205 हेक्टर जागेचे भूसंपादन होणार आहे. या ठिकाणीही मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठी 254 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. (Uday Samant)
हेही वाचा- MP salary : खासदारांना भरघोस पगारवाढ ; माजी खासदारांचेही पेन्शन वाढले
रत्नागिरीमध्ये वाटद एमआयडीसीत हत्यारांचा तर रत्नागिरीत सेमीकंडक्टर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या सेमी कंडक्टर प्रकल्पाचा दुसरा टप्पा रिळउंडी परिसरात होणार आहे. उद्यागमंत्री उदय सामंत यांनी या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी शिरगाव एमआयडीसीत जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांमुळे जवळपास 40 हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. (Uday Samant)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community