हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ आरोग्य शिबिर

93

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ गुरुवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवाजी पार्क दादर मुंबई येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

New Project 2022 11 18T095240.626

सदर प्रसंगी मुबई महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागातर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी आरोग्यसमिती अध्यक्षा डाॅ. अनुराधा पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांसाठी समर्थ व्यायाम शाळेमध्ये संपूर्ण दिवसभर आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरास येणाऱ्या रुग्णांना डॉ. अनुराधा पेडणेकर तसेच पालिकेचे जी/ उत्तर विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य मार्गदर्शन केले.

New Project 2022 11 18T095326.938

( हेही वाचा: बाजार समितीच्या निवडणुकीत आता ‘शेतकरी राज’ )

तसेच, दादर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या आयुर्वेद केंद्राच्यावतीने वैद्य नंदकुमार मुळ्ये यांनी रुग्णांना आयुर्वेदिक रुग्णनिदान चिकित्सा व आरोग्य मार्गदर्शन केले. या शिबीराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.