DCM Devendra Fadnavis : भाजप आमदाराने केलेल्या गोळीबार प्रकरणाची होणार उच्चस्तरीय चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.

272
हरियाणा निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती; DCM Devendra Fadnavis यांचा विश्वास

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून काल शुक्रवारी (०२ फेब्रुवारी) गोळीबार करण्यात आला. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार करण्यात आला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती आहे. याची गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Ind vs Pak Davis Cup Tie : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार भारत – पाक डेव्हिस चषक सामना)

पोलीस बंदोबस्तात वाढ…

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. (DCM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.