बदनामीचा प्रयत्न असल्याचे म्हणत…’त्या’ व्हायरल होणाऱ्या पत्रावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण

110

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून ते पैठण येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या सभेला जास्तीत जास्त उपस्थिती दिसावी म्हणून सभेला हजर राहण्यासाठी ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील एक पत्रक समोर आले आहे. मात्र असे आदेश देणारे एक पत्र चांगलेच व्हायरल होत आहे. हे पत्र बनावट असून आमच्या बदनामीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे सकाळी १० वाजता सभा घेणार आहेत. या सभेला सकाळी १० वाजता हजर रहा, असे आदेश शासनाने काढले आहे.

(हेही वाचा – प्रभादेवीतील राड्यावर ‘मनसे’ची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसेनेने अडीच वर्षात जे…”)

व्हायरल पत्रासंदर्भात शिंदे गटाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय सुट्टी नसतानाही कामकाड सोडून सभेला येण्याची नोटीस अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना देण्यात आली असल्याचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या पत्राबाबत शिंदे गटाने स्पष्टीकरण दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्हायरल होणाऱ्या पत्रावर स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या असल्याचे पत्राद्वारे म्हटले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. असे कोणतेही आदेश किंवा पत्र काढण्यात आले नसून तसे पत्र काढून व्हयरल करणे म्हणजे हा निवळ खोडसाळपणा आहे. हा आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचे जंजाळ यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.