![Jammu and Kashmir च्या उपराज्यपालांची मोठी कारवाई; दहशदवाद्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ Jammu and Kashmir च्या उपराज्यपालांची मोठी कारवाई; दहशदवाद्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-15T160132.535-696x377.webp)
दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना माहिती देण्याचे काम करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी ही कारवाई शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी केली. (Jammu and Kashmir)
मिळलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आढावा बैठकीनंतर एका दिवसात तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ (Dismissal of government employees) करण्याचा निर्णय उपराज्यपाल मनोज सिन्हा (Lieutenant Governor Manoj Sinha) यांनी घेतला आहे. बैठकीत उपराज्यपालांसह पोलिस आणि सुरक्षा संस्थांचे उच्च अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस कॉन्स्टेबल फिरदौस अहमद भट, शिक्षक मोहम्मद अशरफ भट आणि वन विभागातील कर्मचारी निसार अहमद खान यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून, जम्मू आणि काश्मीरमधील ६९ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Degree in Cricket : आता क्रिकेटमध्येही घेता येणार पदवी, मुंबई विद्यापीठात लवकरच अभ्यासक्रमाला सुरुवात)
मनोज सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, दहशतवाद्यांना (terrorist) पाठिंबा देणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असा गुन्हा जो कोणी करेल त्याला सोडले जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल. मनोज सिन्हा यांनी लष्कर आणि स्थानिक पोलिसांना दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. त्यांनी म्हटले होते की, मी तुम्हाला या दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्वातंत्र्य देतो.
(हेही वाचा – Suicide : सेक्सटोर्शनचा बळी; शिक्षकाची अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या)
एका कार्यक्रमाला संबोधित करताना मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्याचाही उल्लेख करत म्हटले होते की, अशा घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. आपल्यामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना शांतता प्रस्थापित होऊ द्यायची नाही. ते नेहमीच कट रचत राहतात. खोऱ्यातील परिस्थितीसाठी बाह्य शक्ती देखील जबाबदार आहेत. पण त्याच्या इशाऱ्यावर खोऱ्यात हिंसाचाराला चालना देणारे अनेक लोक आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community