-
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “मी मनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून, त्यावर समिती स्थापन केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.”
‘लव्ह जिहाद’ संदर्भात कडक भूमिका
मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर भाष्य करताना आपल्या पूर्वीच्या कार्यकाळातील मुद्द्यांवर प्रकाश टाकला. “महिला व बालविकास मंत्री असताना मी यावर आवाज उठवला होता. मात्र, तेव्हा लव्ह जिहादच्या समर्थक आमदार रईस शेख यांनी माझ्यावर केस दाखल केली होती आणि तक्रार केली होती. आता ते कोणावर तक्रार करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “गेल्या वर्षभरात श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, जयश्री शिंदे आणि पूनम शुक्ला यांसारख्या अनेक घटनांमध्ये काय घडले ते समोर आले आहे. असे असतानाही आमदार रईस शेख म्हणतात की लव्ह जिहाद नाही. ही समिती संस्कृतीच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
(हेही वाचा – Scorpio Car Accident : एका व्यक्तीचं कार शिकणं दुसऱ्याच्या जीवावर बेतलं ; Video Viral)
संभाजीनगर घटनेवर प्रतिक्रिया
संभाजीनगरमधील अलीकडील घटनेवर बोलताना मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जातीविशेष लोकांना दिले जाणारे शिक्षण या प्रकारांना कारणीभूत ठरते. अशा घटनांना आमदार रईस शेख यांसारख्या नेत्यांचे समर्थन मिळते.”
विद्यार्थी धर्मांतर प्रकरणावर मतप्रदर्शन
मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विद्यार्थी धर्मांतर प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, “माझ्याकडे लोकांनी तक्रार केली होती. आतापर्यंत २६८ धर्मांतर आणि आदिवासी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. मी संबंधित विभागाला याची माहिती दिली आहे. धर्मांतर करून कोणीही दोन्ही प्रकारचे फायदे घेऊ शकत नाही.”
(हेही वाचा – मालवणमध्ये मार्चपर्यंत उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा; मंत्री Shivendraraje Bhosale यांचे आश्वासन)
सदस्य नोंदणी मोहीम आणि निवडणूक तयारी
भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर भाष्य करताना मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले, “ही मोहीम देशभर सुरू आहे. अमितभाई (अमित शहा) अध्यक्ष असताना हे सुरू झाले. मात्र, याचा एखाद्या निवडणुकीशी थेट संबंध नाही.”
मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या या विधानांमुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, त्यांच्या वक्तव्यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community