ED : ‘ईडी’ची मोठी कारवाई; ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला घेतले ताब्यात

193
ED : 'ईडी'ची मोठी कारवाई; ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला घेतले ताब्यात
ED : 'ईडी'ची मोठी कारवाई; ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला घेतले ताब्यात

पिंपरी-चिंचवडमधील सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बॅंकेतील ४२९ कोटी सहा लाख रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी या बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर अमर मुलचंदानी यांना शनिवारी (१ जुलै) ईडीने मुंबईतून ताब्यात घेतले.

सेवाविकास बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात पोलिसांत २०१९ पासून अनेक गुन्हे दाखल असून त्यात मुलचंदानी यांना अटकही झाली होती. नंतर ते जामीनावर बाहेर पडले. मात्र या प्रकरणात ‘ईडी’ची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर २७ जानेवारी २०२३ रोजी मुलचंदानी यांच्या पिंपरीतील मिस्त्री पॅलेस बंगल्यासह पुण्यात दहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

(हेही वाचा – विनाश काले विपरीत बुद्धि.. ! मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून शरद पवारांवर शरसंधान)

त्यावेळी मुलचंदानीच्या घरातून पावणेतीन कोटी रुपयांचे घबाड ईडीच्या हाती लागले होते. दरम्यान, ईडीचे अधिकारी छापेमारीसाठी आले असता, मुलचंदांनी कुटुंबाने दरवाजा न उघडता अधिकाऱ्यांना काही तास बाहेर ताटकळत ठेवले होते. त्याबद्दल शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पिंपरी पोलिसांनी त्यांना व कुटुंबातील सदस्यांनाही अटक केली होती. मात्र, मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने त्यावेळी त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली नव्हती. ती शनिवारी करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार असताना पोलिसांनी गुन्हे नोंदवून मुलचंदानी यांना अटक केली होती. त्यानंतर बॅंक डबघाईस आली. परिणामी रिझर्व बॅंकेने तिच्यावर प्रशासक नेमला. मात्र, त्याचाही उपयोग न झाल्याने सरतेशेवटी रिझर्व बॅंकेने सेवाविकास बॅंकेचा परवानाच गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला रद्द केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.