तीन दिवसांपूर्वी भिवंडीतील गायत्री नगरात राहणाऱ्या कैकाडी समाजाच्या भगिनी रेणुका माने यांना वेलकम हॉटेलचा मालक रऊफ खान आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. त्या महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या विकास यादव आणि उमेश पाटील या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी भिवंडीतील हजारो हिंदू (Hindu) नागरिक प्रांत कार्यालयावर मोर्चाने गेले आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनातील माहितीप्रमाणे, हिंदू (Hindu) मुलगी रेणुका माने यांची मुलगी 3 ऑगस्ट रोजी वेलकम हॉटेलमध्ये फ्राईड राईसची ऑर्डर देण्यासाठी गेली असता हॉटेल मालक रऊफ शेख यांनी मुलीशी अश्लील बोलणे केले. तिने घरी जाऊन तिच्या आईला म्हणजेच रेणुका माने यांना सांगतात त्यांनी हॉटेल मालकाला जाब विचारला. यावेळी चिडून जाऊन रउफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी तिला अत्यंत घाणेरड्या शिव्या घातल्या आणि हॉटेलचे शटर बंद करून मारहाण सुरू केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच वस्तीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते विकास यादव आणि उमेश पाटील तिच्या मदतीला धावून गेले तर त्या दोघांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दोघांच्याही डोक्यावर हातापायांवर खोल जखमा झाल्या आहेत आणि ते सध्या इस्पितळात उपचार घेत आहेत.
जिहादी मानसिकतेची मुजोरी वाढली
अलीकडच्या काळात एकामागून एक अशा घटना घडत आहेत. जिहादी मानसिकतेची मुजोरी वाढली आहे त्याचे प्रत्यंतर उरण, धारावी आणि आता भिवंडी अशा सर्वच प्रकरणात दिसत आहे. अशा वेळी शासन आणि प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता ठोस कृती करावी, अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच हिंदू (Hindu) मुलगी रेणुका माने कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी पू. चिदानंदजी सरस्वती महाराज, महंत शिवरूपानंद महाराज आणि विहिंपचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पू. चिदानंदजी सरस्वती मोर्चाला संबोधित करताना म्हणाले, “आज हिंदू समाजावरील हल्ले वाढत आहेत. मुली व महिला लव जिहादच्या शिकार होत आहेत, अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या शासनाने याबाबत कठोर भूमिका घेत जिहाद्यांना जेरबंद करावे, त्यांच्या घरांवर, आस्थापनांवर बुलडोझर फिरवावा आणि आपल्या लाडक्या बहिणीना सुरक्षा पुरवावी. विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री मोहनसालेकर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक गौतम रावरीया, पीडित भगिनी रेणुका माने यांनीही आपल्या भाषणात कट्टरतावाद्यांवर जोरदार प्रहार केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडलेल्या या विराट मोर्चाचे संयोजन दादा गोसावी, वैभव, करण आदी बजरंग दल कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले होते. या मोर्चात भाजपाचे आमदार महेश चौगुले, ऍड. मनोज रायचा, मनसे, रा.स्व.संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच आदी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महंत शिवरूपानंद यांनी हिंदू (hindu) समाजाला आपापल्या वस्त्यांमध्ये हिंदू शक्ती केंद्रे उभी करण्याचे आवाहन केले.
Join Our WhatsApp Community