Masjid : ठाण्यात रहिवाशी इमारतीत घरामध्ये उभारली मशीद; दररोज व्हायचे भोंग्यातून अजान; नमाजासाठी व्हायची वर्दळ; मनसेने दिला दणका

इमारतीत विविध जातीधर्माचे लोक राहतात. येथील एका घरात बाहेरून अनेक जण नमाज पठणासाठी येत होते. या घराच्या बाहेर फलकावर नमाजाच्या वेळा लिहिण्यात आल्या होत्या. ज्या मजल्यावर ही खोली आहे, त्या मजल्यावर बाहेरून भोंगा लावून मोठ्या आवाजात दिवसातून तीन वेळा नमाज पठण केला जात होता.

507

एमएमआरडीए रहिवाशी इमारतीत बेकायदेशीर मशीद (Masjid) उभारण्याचा डाव मनसेने उधळून लावला आहे. ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या मदतीने या इमारतीवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे आणि घराच्या बाहेर लावण्यात आलेला नमाजाच्या वेळेचा फलक उतरवला आहे. हा प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा येथे घडला होता.

इमारतीच्या घरात बाहेरून अनेक जण नमाज पढण्यासाठी येत होते.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी एमएमआरडीएकडून बांधण्यात आलेल्या इमारतीत अनेक कुटुंबांना विस्थापित करण्यात आले आहे. इमारतीत विविध जातीधर्माचे लोक राहतात. येथील एका घरात बाहेरून अनेक जण नमाज पठणासाठी येत होते. या घराच्या बाहेर फलकावर नमाजाच्या वेळा लिहिण्यात आल्या होत्या. ज्या मजल्यावर ही खोली आहे, त्या मजल्यावर बाहेरून भोंगा लावून मोठ्या आवाजात दिवसातून तीन वेळा नमाज पठण केला जात होता. भोंग्याच्या कर्णकर्कश आवाजामुळे स्थानिकांना त्रास होतच होता, परंतु विद्यार्थ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास होत होता. धार्मिक बाब असल्यामुळे स्थानिकांकडून हे सर्व सहन करावे लागत होते, परंतु परीक्षांचे दिवस सुरू आहे, १२ वीची परीक्षा सुरू आहे, हे माहीत असूनदेखील या भोंग्याचा आवाज तसूभरही कमी करण्यात येत नव्हता. स्थानिक नागरिक, विद्यार्थी या भोंग्याच्या आवाजाने हैराण झाली होती. हा प्रकार ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली.

(हेही वाचा Sharad Pawar : योगेश सावंत ते शरद पवार; काय आहे ब्राह्मण विरोधी कनेक्शन?)

घराला छोट्या मशिदीचे स्वरूप

अविनाश जाधव यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांसह या ठिकाणी धाव घेतली असता तेथील भयानक चित्र समोर आले. इमारतीच्या बाहेर मोठ्या आवाजात भोंगा लावून अनेक जण एका घरात नमाज (Masjid) पठण करीत होते, या घराला छोट्या मशिदीचे स्वरूप देण्यात आले होते, या कथित मशिदीच्या बाहेर नमाजाच्या वेळेचे फलक लावण्याले होते. मनसे नेते जाधव आणि पोलिसांनी इमारतीच्या बाहेरील बेकायदेशीर भोंगे काढून घराबाहेर लावण्यात आलेला फलक काढून रहिवाशी इमारतीत असणाऱ्या घरात मशीद (Masjid) बनविण्याचा डाव उधळून लावण्यात आला. नमाज पढण्यासाठी आमचा विरोध नाही, परंतु धर्माच्या नावाखाली जे काही चाललंय, ज्यामुळे इतरांना त्याचा त्रास होत आहे, त्याला आमचा विरोध असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. यानंतर पुन्हा असा प्रकार घडल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

घराला मशीद करणारे आहेत तरी कोण?

ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रकल्पबाधित विस्थापित कुटुंबांना ठाण्यातील घोडबंदर रोड चितळसर येथे एमएमआरडीएकडून इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी अनेक इमारती रिकाम्या असून अनधिकृत भोंग्याचा प्रकार ज्या इमारतीत घडला त्या इमारतीत मुंब्रा येथील विस्थापित कुटुंब राहण्यास आले आहे. मशिदींवर (Masjid) भोंग्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही असे प्रकार घडतात, त्यामुळे पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा पुढच्या वेळी मनसे स्टाइलने दणका देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.