मुंबई प्रतिनिधी
Minister Akash Phundkar : माथाडी कायद्यामुळे (Mathadi Law) अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला असून त्यांच्या जीवनात सुलभता आली आहे. त्यामुळे माथाडी कायदा हा केवळ कायदा नसून एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) न्यायप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. (Minister Akash Phundkar)
कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या (Mathadi Law Bachav Kruti Samiti Meeting) पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
(हेही वाचा – Sambhal Masjid सरकारी जमिनीवर; उत्तर प्रदेश सरकारची सर्वोच्च न्यायालयाल माहिती )
माथाडी कायदा रद्द होणार नाही
माथाडी कायदा रद्द (Mathadi Act repealed) होईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे हा कायदा लागू आहे, आणि तो रद्द होणार नाही. उलट, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून आवश्यक ते सुधारणा करण्यात येतील, असे स्पष्ट मत मंत्री फुंडकर यांनी व्यक्त केले.
पदभरतीत अंशतः न्याय
माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांची त्यावर नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. तसेच, विविध माथाडी मंडळांच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत अंशतः तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या मुलांना रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल, असेही फुंडकर यांनी सांगितले.
विभागवार माथाडी मंडळांशी संवाद साधणार
कामगारांच्या (worker) प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विभागवार माथाडी मंडळांशी संवाद साधण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. तसेच, सुरक्षा रक्षक मंडळाच्या समस्यांवरही विशेष विचार करण्यात येईल, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
(हेही वाचा – किसान सन्मान निधी १२ ऐवजी १५ हजार रुपये मिळणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा )
बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
या बैठकीस अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, सुरक्षा रक्षक कामगार युनियन, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी कामगार विभागाचे प्रधान सचिव आय.ए. कुंदन, खाजगी सचिव रवींद्र धुरजड, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अवर सचिव दिलीप वणीरे, सहआयुक्त शिरीन लोखंडे तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे बाबासाहेब आढाव आणि इतर युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community