शिवसेना उबाठा गटाने (UBT Group) मंगळवारी महापत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली आणि निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलो असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक होत होत होत्या का? असा सवाल केला जात आहे. (Uddhav Thackeray)
व्हिडीओ दाखवले
ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महापत्रकार परिषदेत उबाठा गटाने २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये लोकशीची कशी पायमल्ली केली, याची कबुली दिली. दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये पक्षप्रमुख, नेते आणि उपनेते यांची निवडणूक घेतल्याचे व्हिडीओ दाखवले. (Uddhav Thackeray)
३१ पदांसाठीही ३१ अर्ज म्हणजे निवडणूक?
या दोन्ही निवडणूकीत जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. २०१३ आणि २०१८ मध्ये पक्षप्रमुख एकच पद असून एकच अर्ज प्राप्त झाला, अशी माहिती देण्यात आली. पक्षप्रमुख या पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशिवाय दुसऱ्या कुणीही अर्ज दाखल केला नाही तर ९ नेते आणि २१ उपनेते अशा ३१ पदांसाठीही बरोबर ३१ अर्ज प्राप्त झाल्याचे पक्षाने नेमणूक केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray)
कुठल्या लोकशाहीत बसते?
२०१३ आणि २०१८ पूर्वीही पक्षात अशाच प्रकारे नियुक्ती-निवडणूक होत होती अशी माहिती एका शिवसेना नेत्याने दिली. जितक्या जागा तितकेच अर्ज प्राप्त झाले, त्यामुळे हे कुठल्या लोकशाहीत बसते? असा सवाल विचारला जात आहे. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – BJP : मित्र पक्ष भाजपसाठी जागांचा त्याग करणार?)
२०१३ पूर्वीदेखील अशाच निवडणुका झाल्या
शिवसेना (शिंदे) पक्षाचे लोकसभेतील नेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेत सगळं आधीच ठरलेलं असायचं आणि निवडणुका घेणं हे केवळ दाखवण्यापुरतं होतं, असे स्पष्ट केले. २०१३ पूर्वीदेखील अशाच निवडणुका झाल्याचे शेवाळे यांनी सांगितले. (Uddhav Thackeray)
शिवसेना उबाठा गटाचे (UBT Group) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बहुतांश जाहीर सभांमध्ये भाजपवर टीका करताना लोकशाही धोक्यात आली आहे आणि ‘संविधान बचाव’ची यावर अनेकदा भाषणे ठोकली आहेत. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे आणि निवडणूक यांचे काहीही देणे-घेणे नाही
भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि निवडणूक यांचे काहीही देणे-घेणे नाही असे सांगत ते सगळं नाटक असल्याचे म्हटले. “शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आग्रहास्तव निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे नाटक केले. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि निवडणूक यांचे काहीही देणे-घेणे नसल्याने ते स्वतःच घटनाबाह्य आणि कायद्याला विसंगत काम करीत आहेत. त्यांना घटना आणि लोकशाही वाचवायची चिंता नाही तर स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता अधिक आहे,” असा टोलाही भातखळकर यांनी लगावला. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community