पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारे कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावाने उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला होता. या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले होते की, येत्या १ जुलैला ठाकरे गटाच्या वतीने मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढला जाणार आहे, ज्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत.
महायुतीतर्फे मुंबईत दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. युवा मोर्चा आणि महायुतीच्या घटक पक्षांतर्फे नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालय तसेच महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे दादर स्वामीनारायण मंदिर येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल#BJP #JanAkrosh #Mumbai… pic.twitter.com/VjJ7z1sly9
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 30, 2023
या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचार जाईल. तर याचे प्रतिउत्तर म्हणून आता भाजप, शिवसेना आणि आरपीआयकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. ‘चोर मचाये शोर’चा नारा देत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला भाजप, शिवसेना, आणि आरपीआय महायुतीकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. महायुतीकडून या मोर्चाविरोधात प्रत्युत्तर मोर्चा काढला जाणार आहे. शनिवारी चार वाजता महायुतीच्या वतीने नरिमन पॉईंट येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने महायुती ठाकरे गटाविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
(हेही वाचा – फडणवीस आणि शिंदे यांनी घेतली अमित शाह यांची भेट; शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार स्थान)
एक जुलैला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधताना मुंबई महालिकेच्या कारभारावरून गंभीर आरोप केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community