भाजपाच्या सदस्यता मोहिमेचा आढावा; Ravindra Chavan यांचे मार्गदर्शन

32
भाजपाच्या सदस्यता मोहिमेचा आढावा; Ravindra Chavan यांचे मार्गदर्शन
  • प्रतिनिधी

भाजपाच्या सदस्यता मोहिमेचा आढावा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी घेण्यात आला. या आढावा बैठकीस कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा युवा मोर्चा तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सदस्यता मोहिमेच्या अनुषंगाने उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भाजपाच्या प्राथमिक सदस्यता मोहिमेची मुदत १९ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सर्व स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बुथ स्तरावरील जबाबदार व्यक्तींनी अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

(हेही वाचा – Virat Kohli : रणजी सामन्यात एका चाहत्याची मैदानात घुसखोरी, सुरक्षा रक्षकांची भंबेरी)

महाराष्ट्रासाठी दीड कोटी सदस्यांचे लक्ष्य

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भाजपाच्या सदस्यसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. “महाराष्ट्रासाठी दीड कोटी सदस्य जोडण्याचे लक्ष्य ठेवले असून हे लक्ष्य अधिक वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात क्रियाशील सदस्यांची भक्कम फौज उभी करण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

(हेही वाचा – UPI Payments : …तर १ फेब्रुवारीपासून तुमच्या यूपीआय खात्यातून व्यवहार होणार नाहीत)

कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा

चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कार्यकर्त्यांना पक्षसंघटना बळकट करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. गावपातळीपासून शहरांपर्यंत भाजपाचा विस्तार होण्यासाठी सदस्य नोंदणी मोहिमेला अधिक गती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस आमदार विक्रांत पाटील, रवि अनासपुरे, हेमंत म्हात्रे, युवा मोर्चाचे अनुप मोरे आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सदस्यता मोहिमेच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला गेला तसेच आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.