शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकांचा मातोश्रीबाहेर रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने या शिवसैनिकाचे निधन झाले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यातले भगवान काळे हे मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती, वाशाळा गाव येथील शिवसेनेच्या पदाधिका-यांना घेऊन ते आपल्या गाडीने वांद्रे कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते. मातोश्रीत बैठक सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. भगवान काळे यांना नंतर कलानगरच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. भगवान काळे यांच्या मृत्यूने शहापुरातील शिवसैनिक पदाधिका-यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
( हेही वाचा: संजय राऊतांना मुंबई पोलिसांचा दणका; ‘जितेंद्र नवलानीं’ची एसआयटी चौकशी केली बंद )
Join Our WhatsApp Community