निवडणुकीपूर्वी Rohit Pawar यांना धक्का; ‘हा’ जवळचा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश 

189
निवडणुकीपूर्वी Rohit Pawar यांना धक्का; ‘हा’ जवळचा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश 
निवडणुकीपूर्वी Rohit Pawar यांना धक्का; ‘हा’ जवळचा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश 

आगामी विधानसभा (Vidhan Sabha election 2024) निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे. तर सत्ताधाऱ्यांसह विरोधकीय पक्षातील मंडळी सध्या प्रचार सभा घेण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात अनेक घडामोडी घडत असतात. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांचे कर्जत – जामखेड विधानसभा (Karjat – Jamkhed Assembly) प्रमुख प्रा. मधुकर राळेभात (Prof. Madhukar Ralebhat) व शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशीद (Sanjay Kashid) तालुका कार्यकार्णीसह दिनांक २४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. प्रा. मधुकर राळेभात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Rohit Pawar)

राळेभात व काशिद यांचा भाजपा प्रवेश राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा राजकीय धक्का देणारा ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे. प्रा. राळेभात यांनी २५ ऑगस्टला पक्षाचा राजीनामा दिला होता. आमदार प्रा. राम शिंदे यांनी त्यांना भाजपात यावे, अशी खुली ऑफर दिली होती.

(हेही वाचा – “काँग्रेसला चांगल्या दिवसात दलितांचा विसर पडतो”, Mayawati यांचा टोला)

मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी दोन वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis), केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. (Rohit Pawar)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.