शरद पवारांना धक्का ? बडा नेता BJP प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा

334
शरद पवारांना धक्का ? बडा नेता BJP प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा
शरद पवारांना धक्का ? बडा नेता BJP प्रवेशाच्या तयारीत, विनोद तावडेंशी बंद दाराआड चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील मोहरे हेरत एकमेकांना शह देण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे.

दरम्यान राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजपा (BJP) नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये आरोप करण्यातही गोंधळ)

सांगलीत भाजपा (BJP) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला भाजपा (BJP) नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. याआधीही नाईक भाजपामध्येच होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – ED Raids: उत्तराखंडमधील बनावट रजिस्ट्री घोटाळा प्रकरणी देशातील ५ राज्यांमध्ये ईडीची छापेमारी)

झिशान सिद्दिकी आणि अंतापुरकर महायुतीच्या मार्गावर

काँग्रेसची दोन आमदार झिशान सिद्दिकी आणि अंतापुरकर यांच्यावरती विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचे आरोप लागल्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी केल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. यानंतर झिशान सिद्दिकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर अंतापुरकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत.

काही दिवसापूर्वी कोल्हापूरातील भाजपा नेते समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) भाजपाला आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.