देशद्रोही आपला आयकॉन असू शकत नाही; औरंगजेबवर RSS ने मांडली स्पष्ट भूमिका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा 23 मार्चला बंगळुरू येथे समारोप झाला.

58

औरंगजेबाने जे काही केले, त्याबद्दल त्याला आयकॉन मानले जाऊ शकत नाही. दिल्लीत एक औरंगजेब रोड होता, त्याचे नाव अब्दुल कलाम रोड करण्यात आले. यामागे काही कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहला कोणीही नायक बनवले नाही. ‘गंगा-जमुना’ संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी कधीच दारा शिकोहला पुढे आणण्याचा विचार केला नाही. आपण भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या व्यक्तीला आपला आयकॉन बनवणार की, या देशाची संस्कृती, परंपरा आणि मातीशी नाळ असलेल्या लोकांना आपला आयकॉन बनवणार?, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) चे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा 23 मार्चला बंगळुरू येथे समारोप झाला. त्यानंतर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. स्वातंत्र्याचा लढा हा केवळ इंग्रजांविरुद्ध लढला गेला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी मुघलांविरोधात लढा दिला होता. तोही स्वातंत्र्यलढाच होता. देशातील जनतेने ठरवायचे आहे की, ते औरंगजेब मानतात की दारा शिकोहला आपले आयकॉन मानतात? देशाला गांभीर्याने विचार करावा लागेल की, आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले? देशाच्या शूर सुपुत्रांनी इंग्रजांच्या आधी आलेल्या आक्रमकांशी लढा दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. (RSS)

(हेही वाचा Bangladeshi Infiltrators : मानवी तस्करी करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरांना अटक; चोरीसाठी १० वेळा सीमा ओलांडली)

भारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हे नको होते. कोणतेही सरकार असे करत असेल, तर ते डॉ. आंबेडकरांच्या हेतूविरुद्ध काम करत आहे, असेही होसबळे (RSS) यावेळी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.