दारू पिऊन अश्लील चाळे करणे होणार non-bailable offence?

84
दारू पिऊन अश्लील चाळे करणे होणार non-bailable offence?
  • सुजित महामुलकर

पुण्यात गौरव आहुजा नावाच्या उद्योगपती पुत्राने दारूच्या नशेत भर रस्त्यात लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अशा बापकमाईवर नशा करून अशील चाळे करणाऱ्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी ‘महाराष्ट्र दारूबंदी कायद्यात सुधारणा’ सुचवणारे अशासकीय विधेयक भाजपाच्या आमदारांनी विधानसभेत मांडले. हे अशासकीय विधेयक मंजूर झाल्यास ‘सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत असल्याचे आढळून आल्यास हा अजामीनपात्र अपराध’ म्हणून समजण्यात येईल. (non-bailable offence)

भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अतुल भातखळकर यांनी ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९’ मध्ये सुधारणा सुचवणारे विधेयक शुक्रवारी ७ मार्च २०२५ या दिवशी सायंकाळी विधानसभेत मांडण्यात आले. (non-bailable offence)

(हेही वाचा – Assam मध्ये रमजानसाठी आता घोड्याच्या मांसाचीही विक्री)

शिक्षा वाढ

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ८५ मध्ये पोट-कलम १ आणि २ मध्ये सुधारणा करावी असे या विधेयकांत नमूद करण्यात आले आहे. “जो कोणताही इसम सार्वजनिक स्थळ जसे की, हॉटेल, बार इत्यादी परवानाधारक स्थळे की जेथे बसून दारू पिण्याकरिता परवानगी आहे, अशा जागा वगळता अन्य सर्व सार्वजनिक स्थळांवर दारूच्या नशेत असल्याचे आढळून आल्यास, अशा व्यक्तीस दोषी ठरविण्यात येईल व त्या व्यक्तीस खालील प्रमाणे शिक्षा होईल, (अ) पहिल्या अपराधाबद्दल एक वर्ष सक्ती मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपयांपर्यत दंडाची शिक्षा होईल. (ब) नंतरच्या अपराधाबद्दल दीड वर्ष सक्ती मजुरीची शिक्षा व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा होईल, असा बदल पोट-कलम १ मध्ये सुचवण्यात आला आहे. तर पोट-कलम २ मध्ये, सदरचा अपराध अजामीनपात्र राहील, अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. (non-bailable offence)

सध्या या कायद्यात पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यंत आश्रम कैद आणि दहा हजार रुपे डांड आणि त्यानंतरच्या अपरधाबद्दल एक वर्षे कैद आणि १०,००० रुपये दंड, अशी तरतूद आहे. (non-bailable offence)

(हेही वाचा – Amrit Bharat Station Scheme अंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब)

उद्देश व कारणे यांचे निवेदन

मुनगंटीवार आणि भातखळकर यांनी दारूबंदी कायद्यात बदल सुचवण्यामागील कारण आणि उद्देश काय हे स्पष्ट केले. ‘आपल्या समाजात सार्वजनिक जागांवर दारू पिऊन स्वतःचा तोल सांभाळण्यात असमर्थ झालेले नागरिक मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येत असून त्यांच्याकडून होत असलेल्या अश्लील चाळ्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत असून विशेषतः महिला वर्गात असुरक्षिततेचे व असंतोषाचे वातावरण पसरत आहे,” असे म्हटले आहे. (non-bailable offence)

(हेही वाचा – महिलांनी संरक्षणासाठी काय करावे? मंत्री Gulabrao Patil म्हणाले… )

सार्वजनिक आरोग्यास धोका

“तसेच, काही व्यक्ती धार्मिक स्थळांच्या परिसरात सुद्धा मद्यपान करून बेशिस्त वर्तन करीत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी, धार्मिक स्थळांचे पावित्र्य बिघडत असून सार्वजनिक आरोग्यास सुध्दा धोका निर्माण होत आहे. असा कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या व्यक्तींना आळा बसण्याच्या दृष्टीने सार्वजनिक स्थळांवर मद्यपान करून आढळून येणाऱ्या व्यक्तींना करण्यात येणाऱ्या शिक्षेच्या तरतुदीत वाढ करणे इष्ट झाले आहे. अतः यास्तव मुंबई दारूबंदी अधिनियमात सुधारणा करण्याकरिता सदरहू विधेयक सादर करण्यात येत आहे,” असे मत मुनगंटीवार आणि भातखळकर यांनी व्यक्त केले. (non-bailable offence)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.