राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जितेंद्र आव्हाडांचा मंत्रालयाच्या समोर शिवगड हा बंगला आहे. या बंगल्यासमोर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तेथे हजर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या महिलेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तिला अडवले.
(हेही वाचा – BDD चाळीतील निवृत्त पोलिसांनाही मिळणार घर!)
पोलिसांकडून तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती कांबळे असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला बीडीडी चाळीत राहण्यास आहे. या घटनेनंतर या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे 1 कोटी 5 लाख ते 1 कोटी 15 लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या 2250 पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2022
गेल्या दोन दिवसांपूर्वी बीडीडी चाळीसंदर्भात बुधवारी एक महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घऱ मिळणार असल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. बीडीडी चाळीत २२५० निवृत्त पोलिसांना घर मिळणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी ५० लाख रुपये घरासाठी किंमत द्यावी लागणार आहे. अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहे.
Join Our WhatsApp Community