भाजपचा दणका : दादरच्या फेरीवाल्यांना आधार कार्ड जमा करण्याच्या सूचना

173

दादर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर फेरीचा व्यवसाय करणारे सर्व बंगाली मुसलमान असल्याने त्या सर्वाचे आधार कार्ड तपासण्याची मागणी भाजपने केला आहे. त्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांना आमचा कोणताही विरोध नसून बाहेरून येत या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मुस्लिमांना आपला विरोध असल्याचे जाहीर करत भाजपने त्यांना विरोध दर्शवला आहे. भाजपच्या या मागणीनंतर दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व फेरीवाल्यांचे आधार कार्ड गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व फेरीवाल्यांनी आपले आधार कार्ड गोळा केल्यानंतर त्या सर्वांची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे यापुढे दादरमध्ये मुंबईत राहणाऱ्या स्थानिकांना व्यवसाय करता येणार आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या बॅकबे आणि कुर्ला आगारातील उपहारगृहे बंद! कर्मचाऱ्यांची गैरसोय)

दादर मध्ये फेरीचा व्यवसाय करताना महापालिकेने जप्त केलेल्या सामान सोडवण्यासाठी काही दलाल मंडळी आपल्या मर्जीतील लोकांचा माल सोडवतात आणि इतर गरीब फेरीवाल्यांच्या माल अडकवून ठेवतात. एवढेच महापालिकेने जप्त केलेले या सामान ज्या गोदामात जमा केले जाते त्या ठिकाणी शमशुद्दीन आणि त्याचे साथीदार उपस्थित असतात. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे फेरीवाल्यांचा माल सोडवतात. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दादर- माहिम विधानसभेच्या भाजप अध्यक्ष अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे सहकारी महापालिकेच्या वडाळा येथील गोदामात धडकले. त्यावेळी ही मंडळी तिथे दिसली. त्यावेळी तेंडूलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला आणि या माणसाचा याठिकाणी काम काय अशी विचारणा केली.त्यावेळी ज्या फेरीवाल्यांचा सामान महापालिकेने जप्त केले होते. त्या फेरीवाल्यांचे सामान त्या गोदामात सापडतही नव्हते. हे सामान सोडवण्याची पूर्णपणे हमी तिथे बसलेले शमशुद्दीन नावाची व्यक्ती यांनीच घेतली होती. त्यामुळे तेंडुलकर आणि त्यांच्या साथीदारांनी शमशुद्दीन ला चांगलेच फैलावर घेतले. या घटनेनंतर अक्षता तेंडुलकर आणि भाजपचे पदाधिकारी जितेंद्र राऊत यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दादर मध्ये बंगालमधील मुस्लिमांना आणून शमशुद्दीन आणि त्याच्या भाऊ व्यवसाय करायला लावत आहे, तसेच महाराष्ट्रमधून येणाऱ्या शेतकऱ्यांची भाजी परस्पर विकत घेऊन आपल्या माणसांकडून विकली जात आहे असा आरोप केला. सर्व फेरीवाले मुंबईच्या बाहेरून येत असून स्थानिक फेरीवाल्यांना आमचा कोणताही विरोध नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांना आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या सर्वांचे आधार कार्ड तपासल्यास ही सर्व मंडळी कुठल्या राज्यातील आणि कुठल्या भागातील आहेत ते स्पष्ट होईल अशा प्रकारची भूमिका त्याने पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली. या घटनेनंतर दादर आणि शिवाजी पार्क पोलीसांनी या सर्व भागातील फेरीवाल्यांना आपापले आधार कार्ड चे झेरॉक्स हे दादर येथील चौकीमध्ये सादर करण्याची सूचना केली असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारपासून आधार कार्ड पोलीस ठाण्यात जमा करून प्रत्येक फेरीवाल्यांची आधार कार्ड निहाय ओळख पटवली जाणार आहे. ज्याद्वारे फेरीवाला हा मुंबई किंवा मुंबई बाहेरील आहे याची ओळख पटवणे पोलीसांनाही शक्य होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.