Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सल्ला दिला अन् स्वतःच झाले ट्रोल

385
सीईटी परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा; Aaditya Thackeray यांची मागणी

‘हात दाखवून अवलक्षण’ म्हणतात ते असं. राज्यात २१ जागा लढून ९ जागा जिंकणाऱ्या शिवसेना उबाठाला ‘केंद्रात आपले सरकार येणार आणि मग आपण लोकसभा सभापती पद मागू’, अशी दिवास्वप्न आदित्य ठाकरे यांना पडू लागली आणि त्यांनी भाजपाच्या मित्रपक्षांना हा सल्ला दिला. आणि नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. (Aaditya Thackeray)

ठाकरेंची पोस्ट

आदित्य ठाकरे यांनी काल ७ जूनला ‘X’ एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी ‘एनडीए’चे घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू (टीडीपी) आणि नितीश कुमार (जनता दल-संयुक्त) यांना उद्देशून एक पोस्ट करून सल्ला दिला की, “सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा.” एवढ्यावरच न थांबता, “भाजपच्या कपाटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरू करतील.” तसेच त्यांनी या पोस्टमध्ये टीडीपी आणि ‘जनता दल-संयुक्त’ ला टॅग केले. (Aaditya Thackeray)

(हेही वाचा – Rahul Gandhi : लोकसभेतील वजन वाढताच गांधी घराणे म्हणते…, खरगे, आता तुम्ही निघा)

आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवरील काही प्रतिक्रिया वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत:

-“अहो पेंग्विन भाऊ …१८ खासदारांवरून ९ वर आलेत याची लाज बालगाईच सोडून कोठे पुढे रान मारताई…देवाने मेंदू दिला आहे ना विचार करा …का काही बरळाईच”

-“उबाठा सारखं नाही वागले एनडीए तील घटक पक्ष, निवडणुक झाल्यावर रुसुन नाही बसले ‘मलाच शीम करा’ म्हणत..”

-“तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी साथ सोडतांना लाज वाटायला पाहिजे होती.तुमचा पक्ष त्यांनी फोडला नाही तर तुम्ही ज्या विचारांनी तुम्हाला आम्ही मत दिली तो विचारच गुंडाळून ठेवला म्हणून लोक फुटले.बस करा रडणं आता काँग्रेसने पण जागा दाखवली तुम्हाला तुमची जो आदर इकडे होता तो कधीही मिळणार नाही.”

-“तुमचं बघा… हिरवा color झाला आहे तुमचा. गद्दार तर तुम्ही आहात khangress सोबत गेले.”

-“तुझ्या वाया पेक्षा जास्त अनुभव चद्र बाबू ला आहे आधी आपल्या गांजा राऊत ला संभाळ,”

-“ऊबाठाचा चान्स हुकला.भाजप उध्धव अहंकारीला हिंगानी सुध्धा विचारणार नाही.”

-“ओ छोटे साहेब.. सामान्य जनतेची नाळ ओळखा.. कपट तूम्ही केलेत आणि आमचा जो कौल होता सेना भाजपा साठी तो तुम्ही तोडलात.. आता असं बोलू नका की मराठी माणसाने तुम्हाला जिंकवले.. मराठी माणसांनी जिथे जिथे मतदान केले तिथे शिंदे भाजपा पुढे होते.. तुम्ही निव्वळ मुस्लिम मतांवर जिंकला आहात..”

-“असा किती अनुभव घेतला आहे तुम्ही राजकारण रर…… सुद्धा माहिती नसेन मशाल घेऊन महाराष्ट्रातला पप्पुला घराबाहेर पडायला निवडणुकीचा काळ उजाडावा लागला… नाहीतर हा कोंबडा घरात बसून आरवत राहायचा.” (Aaditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.