ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा (BJP) आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. आदित्य ठाकरे राहत असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले.
(हेही वाचा –Uddhav Thackeray: ठाकरेंना दणका मिळणार? उबाठाचा आमदार भाजपच्या वाटेवर, चर्चांना उधाण)
रामा हॉटेलच्या बाहेर आदित्य ठाकरेंना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला. अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तसंच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू होण्याआधीच जोरदार राडा झाला आहे. (Aaditya Thackeray)
(हेही वाचा –सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच CM Eknath Shinde मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावर! अधिकारी लागले कामाला)
आदित्य ठाकरे पैठण वैजापूर तालुक्यात सभा शेतकरी संवाद मेळावे घेणार आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचे म्हणजे घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. (Aaditya Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community