महाराष्ट्राची दिशाभूल करू नका! आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार 

165

राज्यात आजपर्यंत पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुभाष देसाई यांची जानेवारी 2020 मधील एक बातमी दाखवली. ही बातमी त्यांनी पूर्ण वाचली असती तर त्यांना सर्व लक्षात आले असते. त्यांनी उल्लेख केलेला फॉक्सकॉनचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. 2016मध्ये या प्रकल्पाची एमओव्ही साईन करण्यात आली होती. ही कंपनी महाराष्ट्रात मोबाईलची निर्मिती करणार होती. मात्र त्यानंतर फॉक्सकॉनने तमिळनाडूत जागा पाहिली आणि नंतर यूएसमध्ये जागा पाहून उत्पादन सुरू केले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी याचा खुलासा केला.

फॉक्सकॉन आणि वेदांत वेगळे प्रकल्प 

तत्कालीन फडणवीस सरकारने पाच वर्षे काहीही न केल्याने एमओव्हीची जी जागा निश्चित केलेली ती लॅप्स झाली, त्याचे उत्तर सुभाष देसाई यांनी विधीमंडळातही दिले. हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीपसाठी होता, तर मोबाईल फोनसाठी नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या. दोन्ही वेगळे प्रस्ताव आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

(हेही वाचा गुजरातमधील झुलता पूल पडण्यामागे काय होते कारण?)

मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित 

खोके सरकारकडून एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. यात सिनार मास पल्प अँड पेपर प्रकल्प रायगडात आम्ही आणल्याचा दावा केला आहे, परंतु दावोसमध्ये असताना नितिन राऊत, सुभाष देसाई आणि माझ्या उपस्थितीत या प्रकल्पाचा एमओव्ही साईन झाला होता. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात आलेला आहे. एमआयडीसीने 23 मे 2022 ला एक ट्विट केले होते, असा पुराव्यासह खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला. खरेतर आज उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. परंतु राज्याचे जे प्रमुख असतात साधारपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित होते. पण एक चांगले झाले की उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतल्याने त्यांना माईक खेचायची, चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगायची मेहनत करावी लागली नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.