- खास प्रतिनिधी
विधिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी शनिवारी विधानसभा सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. फडणवीस शपथ घेतल्यानंतर आपल्या जागेवर जात असताना आदित्य ठाकरे त्यांना हात मिळवून शुभेच्छा देण्यासाठी दोन पावले पुढे गेले पण फडणवीस यांचे लक्ष नसल्याने ते जागेवर निघून गेले. यामुळे अपमानित झालेले आदित्य दोन-तीन मिनिटे जाग्यावर बसून अचानक उठून सभागृहातून बाहेर निघून गेले. (Aaditya Thackeray)
सभागृहात घोषणा
आमदारकीची शपथ घेण्यासाठी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुकारताच सभागृहात एकच जल्लोष झाला. जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. (Aaditya Thackeray)
(हेही वाचा- ढाक्यातील Pakistan Embassy ठरले धर्मांधांचे केंद्र; हिंदूंविरोधात कट रचून घडवले ३ हजारांहून अधिक हल्ले)
आदित्य विचार करत राहिले
फडणवीस शपथ घेऊन विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन आपल्या जागेवर जात असताना विरोधी पक्षातील सर्व आमदारांना हात जोडून नमस्कार करत चालत होते. विरोधी पक्षाच्या बाकांवरील पहिल्या रांगेजवळ पोहोचताच आदित्य यांनाही फडणवीस यांनी स्मित हास्य करीत नमस्कार केला. आदित्य यांनीही त्यांना प्रतिसाद देत जागेवर उठून उभे राहत नमस्कार केला आणि २-३ सेकंद विचार करत हात मिळवण्यासाठी दोन पावले पुढे गेले. मात्र तोपर्यंत फडणवीस आपल्या जागेच्या दिशेने चालू लागले. (Aaditya Thackeray)
एकमेकांकडे पाहणे टाळले
फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि ते विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करत थेट चालत आपल्या जागेकडे निघून गेले. यावेळी शिंदे आणि आदित्य यांनी एकमेकांकडे पाहणेही टाळले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. (Aaditya Thackeray)
(हेही वाचा- India Advisory on Syria : ‘ताबडतोब देश सोडा’; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?)
योगायोग
तोपर्यंत आदित्य ठाकरे यांना कदाचित अपमान झाल्याची भावना निर्माण झाली असावी आणि ते सभागृहातून बाहेर निघून जात असतानाच समोरून अजित पवार शपथ घेऊन येत होते. योगायोगाने भेट झाली आणि तेव्हा आदित्य यांनी अजित पवार यांना हात मिळवून शुभेच्छा दिल्या. (Aaditya Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community