Aaditya Thackeray यांच्यामुळे दोन आमदारांची आमदारकी धोक्यात?

306
Aaditya Thackeray यांच्यामुळे दोन आमदारांची आमदारकी धोक्यात?

लोकसभेनंतर राज्यातील राजकीय पक्षांना आता वेध लागलेत ते आगामी विधानसभा निवडणुकांचे. शिवसेना उबाठा नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी आता वरळी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित राहिला नाही. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी नव्या आणि पूर्णपणे सुरक्षित विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यात शिवडी आणि विक्रोळी या मतदारसंघांचा प्रामुख्याने विचार सुरू असल्याचे कळते. (Aaditya Thackeray)

ठाकरेंसाठी दोघांची वर्णी परिषदेवर

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली. ठाकरे यांना निवडणूक सोपी जावी यासाठी वरळीचे माजी आमदार आणि तत्कालीन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला तसेच शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि अहिर यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. (Aaditya Thackeray)

ठाकरे यांची जवळपास २२,००० मते घटली

इतकं केल्यानंतर २०१९ मध्ये ठाकरे यांना ८९,२४८ मते मिळाली आणि ते ६७ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघाचे शिवसेना उबाठा उमेदवार अरविंद सावंत यांना वरळीतून ६७,४२७ मते मिळाली. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत ठाकरे यांची जवळपास २२,००० मते कमी झाली. त्यामुळे तीन-चार महिन्यात होणाऱ्या विधानसभेला ठाकरे यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्यांच्यासाठी नव्या सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. (Aaditya Thackeray)

(हेही वाचा – Rizvi College: पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू!)

सुनील राऊत यांची कारकीर्द धोक्यात?

ठाकरे यांच्यासाठी वरळीतील विधानसभेच्या दोन नेत्यांना निवडणूक रणांगण सोडावे लागले. यावेळी शिवसेना उबाठाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांची विधानसभेची कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे. याचे कारण गेल्या दोन विधानसभेत (२०१४, २०१९) त्यांनी प्रत्येकी सुमारे २८,००० मतांची आघाडी घेत निवडणूक जिंकली आहे. मात्र २००९ मध्ये मनसेचे मंगेश सांगळे यांच्याकडून शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा २५,००० मतांनी पराभव झाला होता. दळवी यांना त्यावेळी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. (Aaditya Thackeray)

.. तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी निवडणूक जड

विक्रोळीच्या तुलनेत शिवडीचे आमदार अजय चौधरी यांचे मताधिक्य राऊत यांच्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास ४०,००० असले तरी शिवडीत राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली असून २००९ मध्ये मनसेचे बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडू सकपाळ यांना पराभवाची धूळ चारली होती. आता मनसे महायुतीत भाजपासोबत असून ही जागा मनसेच्या वाट्याला गेली तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी निवडणूक जड जाऊ शकते. (Aaditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.