- सुजित महामुलकर
शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य (Aaditya) ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी पाच दिवसांपूर्वी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि आदित्य (Aaditya) यांचे नाव दिशा सालियन प्रकरणातून काढून टाकण्याची विनंती केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे शिवसेना उबाठा नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर असून पक्षप्रमुख हे नेत्यांना लढण्याचा सल्ला देत असताना केवळ सुपुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा भावना लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत. (Aaditya)
भाजपा समविचारी, हिंदुत्व हाच दोन्ही पक्षांचा गाभा
आदित्य (Aaditya) आणि रश्मी ठाकरे यांनी व्हाया पुणे दिल्ली येथे जाऊन शाह यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. आदित्य यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले असल्याने त्यांचे नाव या प्रकरणातून वगळावे, अशी विनवणी रश्मी यांनी केल्याचे कळते. उद्धव ठाकरे यांना काही लोकप्रतिनिधींनी भाजपाशी ‘पॅच-अप’ करण्यासाठी आग्रह धरला. तसेच भाजपाशी जुळवून घेतल्यास आदित्य यांच्यासोबत अन्य लोकप्रतिनिधींनाही दिलासा मिळेल, असे मत काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. भाजपा हा पक्ष समविचारी असून हिंदुत्व हाच दोन्ही पक्षांचा गाभा असल्याने भाजपासोबत जाण्यास फार अडचण येणार नाही, असा आग्रह धरला. मात्र ठाकरे यांनी भाजपासोबत जाण्यास स्पष्ट नकार देत त्यांना लढण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यात नाराजी पसरल्याचे सांगण्यात आले. (Aaditya)
तपासची ‘दिशा’ आदित्यकडे
साडेतीन वर्षापूर्वी बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajpur) आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) या दोघांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी एसआयटी (SIT) तपास सुरु आहे. या तपासाची सुई शिवसेना उबाठा गटाचे (Shiv Sena UBT group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya) यांच्या दिशेने जात असल्याचे दिसत असतानाच आदित्य यांना लवकरच अटक होणार, असे संकेत भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. (Aaditya)
(हेही वाचा – BCCI Central Contracts : श्रेयस, इशानला अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयचं करारपत्र नाही)
अनेक लोकप्रतिनिधी अडचणीत
उबाठाचे बहुतांश आमदार खासदार तसेच त्यांच्या स्वीय सहायकांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि काही अन्य प्रकरणांमध्ये विविध केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा सुरू असून त्यांना लढण्याचा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देत आहेत. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने अटक झाली. तसेच माजी मंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी विविध प्रकरणांत चौकशा सुरू आहेत. (Aaditya)
राजन साळवींची बेहिशेबी मालमत्ता
कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून चौकशी सुरु केली. साळवी यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे नियंत्रण कायदा (PMLA) अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केल्यानंतर परब यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी छापे टाकले आहेत. (Aaditya)
(हेही वाचा – Reliance-Disney Merger : रिलायन्स आणि डिस्नीच्या विलिनीकरणातून जन्म घेणार ७०,३५२ कोटींची नवी कंपनी)
रवींद्र वायकरांचे हॉटेल अनधिकृत
गेल्या महिन्यात ९ जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, पालिकेने हॉटेल बांधकामाची परवानगी रद्द केली आहे. (Aaditya)
अनिल देसाई अडचणीत येणार?
केंद्रीय अन्वेषण विभागाने शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचे स्वीय साहाय्यक दिनेश बोभाटे यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ईडीकडून बोभाटे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्याची शक्यता असून या गुन्ह्याचे धागेदोरे अनिल देसाईपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २ कोटी ६० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमविल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाकडून दिनेश बोभाटे यांच्या विरोधात मिळकतीपेक्षा ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दाखल करण्याचे आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे एका विमा कंपनीमध्ये वरिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने बोभाटे आणि त्यांची पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात १७ जानेवारी रोजी सीबीआयच्या मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. (Aaditya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community