आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादमध्ये मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात असणार आहेत. संवाद आणि मेळावे होतील त्याठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा आता आदित्य ठाकरेंना पुरवली जाणार आहे.
( हेही वाचा : २७ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन; ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार)
आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आता सातवा टप्पा सुरू असून मंगळवारी औरंगाबादच्या महालगावात त्यांची सभा सुरू असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता तसेच आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांनी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्यावेळी अतिरिक्त पोलीस तैनात केले जाणार असून सुरक्षा पुरवली जाणरा आहे.
औरंगाबादमधील गोंधळाच्या घटनेनंतर अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. यात आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेचा दौरा सुरू आहे. ७ फेब्रुवारीला ७ च्या सुमारास औरंगाबाद येथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला यानंतर आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक करण्याता आली. याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी आता शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात ठेऊन सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community