ते खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, जनतेचे नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

125

एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री आहेत, जनतेचे नाहीत, असा टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना लगावला. तसेच महाराष्ट्रात रामराज्य आणायचेय, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

आज गुढीपाडव्याचा दिवस असल्यामुळे राजकारणाबद्दल मी बोलून बालिशपणा करत नाही. काही पक्ष ते करत असतात, ते तसेच आहेत, त्याला आम्ही काय करू शकतो? आजचा दिवस साजरा करायचा आणि म्हणूनच शुभेच्छा सोडून काही बोलणार नाही. गिरगावमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण आहे आणि मी वर्षानुवर्ष तिथे जात आहे, आज देखील तेच वातावरण पाहून खूप मज्जा आली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच अब्दुल सत्तार यांच्या रात्रीच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, गुवाहीटाला गेले की शेतकऱ्यांच्या शेतात गेले हे विचारा. गेल्या महिन्यात किंवा काल-परवा देखील आपल्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झालेला आहे, अनेक ठिकाणी गारपीठ झालेली आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना आधार देणे खूप गरजेचे आहे. हे सरकारचे कर्तव्य आहे, जरी सरकार घटनाबाह्य असले तरी प्रत्येक प्रशासकाच आणि सरकारच जे कर्तव्य असते ते झालेच पाहिजे.

(हेही वाचा – जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री! शिवसेना भवनसमोर मनसेची बॅनरबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.