Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पुन्हा पत्र, म्हणाले…

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या 'रस्ते मेगा घोटाळ्याला जवळपास एक वर्ष झाले आहे.

292
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पुन्हा पत्र, म्हणाले…
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पुन्हा पत्र, म्हणाले…

शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुन्हा एक पत्र पाठवले असून त्यात त्यांनी प्रशासक म्हणून तुमच्या देखरेखीखाली मागच्या एक वर्षाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची दयनीय अवस्था होत चाललेली बघून मुंबईकर हैराण झाले असल्याचे म्हटले आहे. मग तो स्ट्रीट फर्निचर घोटाळा असो की रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा असो की सुशोभीकरण घोटाळा… आणि असे अजून बरेच घोटाळे जे आम्ही उघड करणार आहोत… मुंबई महानगरपालिकेची ढासळत चाललेली कार्यक्षमता आणि वाढत चाललेला प्रचंड भ्रष्टाचार हेच यातून प्रकर्षाने दिसून येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. (Aaditya Thackeray)

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लिहिलेल्या या निवेदनात आदित्य ठाकरे पुढे म्हणतात की, घटनाबाह्य व अनैतिक मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या वतीने, तुमच्या थेट निरीक्षणाखाली मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या ‘रस्ते मेगा घोटाळ्याला जवळपास एक वर्ष झाले आहे. या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता आम्ही सातत्याने मांडली आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना ‘भेट’ दिलीत इथपासून, ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळं होताना प्रत्यक्षात मात्र मुंबईत काहीही कामे झालेली नसणे इथपर्यंत! (Aaditya Thackeray)

(हेही वाचा – World AIDS Day : एचआयव्ही बाधितांना सोबत घेऊन आनंदी जीवन जगण्याचा संकल्प)

तसेच त्यांनी रस्ते कंत्राट कामांचा मेगा घोटाळा असा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांनी, दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे का आणि केले असल्यास, ती माहिती सार्वजनिक का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे. शिवाय या कंत्राटदाराला त्याच्या गुन्ह्यासाठी देय असलेला किती दंड वसूल केला? कंत्राटदाराचे निलंबन करावे लागल्याने, त्याला जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि खुद्द महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का? तसेच दक्षिण मुंबईतील रस्त्याच्या कामांची सुरुवात व्हावी यासाठी नव्या कंत्राटदाराची निवड कधी केली जाईल असा सवालही उपस्थित केला आहे. (Aaditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.