निवडणूक आयोगाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ११ लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. मात्र त्यांचा फॉर्मेट चुकल्यामुळे त्यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याचे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरवली असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. त्यामुळे या बातमीवर कोणीही विश्वास ठेऊ नये आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा)
काय म्हणाले होते फडणवीस?
निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र लागत नाहीत. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्ह द्यायचे यासाठी निवडणूक आयोगाने नियम ठरवलेले आहेत. गेल्या २० वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी दिलेले निर्णय हे याचे प्रमाण आहेत. त्यामुळे कोणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत. कोणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले आणि कोणाचे किती टिकले हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चालले आहे.
Join Our WhatsApp Community