शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे तसेच अन्य नेत्यांना काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव उच्चारण्यासही बंदी घातली आहे का असा सवाल केला जात आहे. काल शुक्रवारी उद्धव ठाकरे तर आज शनिवारी आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते अमित शाह यांच्यावर टीका करतानादेखील सावरकर नावाचा उल्लेख टाळला. अगदी वर्षभरापूर्वी तुमच्यासाठी सावरकर हे दैवत होते आणि त्यांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांना सज्जड दम दिला होता. मग आता दैवताचे नाव घेताना भंबेरी का उडाली, असा प्रश्न जनतेकडून केला जात आहे. (Aaditya Uddhav Thackeray)
उद्धव नकली शिवसेनेचे अध्यक्ष
शुक्रवारी कोकणात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा भाजपा नेते अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना ‘वीर सावरकर यांचे नाव आपल्या भाषणात घेण्याची हिम्मत करू शकतात का?’ असा प्रश करत ‘जर सावरकर यांचे नाव घेण्याची लाज वाटत असेल तर तुम्ही नकली शिवसेनेचे अध्यक्ष आहात,’ असा टोला लगावला. (Aaditya Uddhav Thackeray)
आदित्य यांचे ‘हे’ आणि ‘ते’
ठाकरे पिता-पुत्रांना ही टीका झोंबली. त्याला प्रत्युत्तर कोणत्या शब्दांत द्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला मात्र त्यांना मुद्दा काही सापडला नाही. अखेर शाह यांच्या प्रश्नाला बगल देण्याचे ठरले. आज आदित्य रत्नागिरीतील आपल्या भाषणात शाह यांच्यावर टीका केली. “आता बाहेरचे लोक येऊन असली आणि नकली सेना कोण? हे शिकवायला लागलेत. आम्हाला नकली म्हणताना म्हणता तुम्ही ‘हे’ सोडले आणि ‘ते’ सोडले. हे ठीक आहे पण तुम्ही हिम्मतच सोडली. आमच्यासमोर तुम्ही ड्युप्लीकेट नावे उभे करायला लागले,” अशा शब्दात मूळ मुद्द्याला बगल देत सावरकरांचे नाव घेणे टाळले. (Aaditya Uddhav Thackeray)
(हेही वाचा – IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या पराभवाला जबाबदार कोण?)
उद्धव यांचे ‘याच्यावर’, ‘त्याच्यावर’
तर त्यांचे पिताश्री उद्धव यांनी काल कोकणात जाहीर सभेत भाजपा आणि अमित शाह यांच्यावर ‘बेअकली पक्षाचे सरदार’ अशी टीका करून मनाचे समाधान करून घेतले पण सावरकर यांचे नाव घेणे कटाक्षाने टाळले. “बेअकली पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले. हिम्मत असेल तर ‘याच्यावर’ बोला, ‘त्याच्यावर’ बोला. अमित शहाजी, तुमच्यात जर हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला,” असे उद्धव म्हणाले. (Aaditya Uddhav Thackeray)
‘हिंदुहृदयसम्राट’ शब्दच काही महिन्यांनी उच्चारला
टीका कारायला काही मुद्दा न मिळाल्याने अखेर, मोदी यांच्यावर बोलताना उद्धव म्हणाले, “बाळासाहेबांबद्दल बोलताना मोदी आणि शहा पण ‘बाळासाहेब’ म्हणाले. बाळासाहेब, बाळासाहेब काय? ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणा.. असं म्हणायला तुमची जीभ अडखळत असेल तर ती सरळ कशी करायची हे देशातील जनता जाणते,” अशी टीका केली. कदाचित उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदुहृदयसम्राट’ शब्दच काही महिन्यांनी उच्चारला असेल, त्यामुळेच की काय त्यांना शब्दाचे महत्व जाणवू लागले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Aaditya Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community